बाळ भिमराव हा चित्रपट आम्हचा पुर्वजांनी भोगलेल्या यातनांची जानिव करुन देणारी कलाकृती... मा.आनंदराज आंबेडकर


Newslinesn,Team | Published: 08:05 PM, March 03, 2018IMG

बाळ भिमराव हा चित्रपट आम्हचा पुर्वजांनी भोगलेल्या यातनांची जानीव करुन देणारी कलाकृती...

मा.आनंदराज आंबेडकर 

नागपुर / निलेश झाडे 
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी यातना ,अपमान सहन करावा लागला.नागपुरचा पवित्र दिक्षाभुमिवर लाखो अनूयानांना बौध्द धम्माची दिक्षा देवून आपल्या भावी पिढीला यातनातून मुक्ती दिली. डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बालपणाचा करुणामय जिवनावर आधारीत चित्रपट बाळ भिमराव हा केवळ चित्रपट नसून आपल्या पुर्वजांनी भोगलेल्या यांतनांची ओळख करुन देणारी कलाकृती आहे,असे  मत  रिपल्लीकण सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.ते पवित्र दिक्षाभुमिवर बाळ भिमराव चित्रपटाचा पोस्टर विमोचन प्रसंगी बोलत होते.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाचा जिवनपट उलगडवून दाखविणार्या बाळ भिमराव हा सिनेमा येत्या 9 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर विमोचन सोहळा आज पवित्र दिक्षाभुमीवर सपन्न झाला. सोहळ्याला मा.आनंदराज आंबेडकर ,सिने अभिनेत्री प्रेमा किरण,प्रकाश पाटणकर,निर्माते आनंद अहिरे,मनिष कांबळे,प्रख्यात कवाल सरवर जाँनी,निशा भगत उपस्थित होते.